Thursday, February 11, 2016

शहरातली ’समोवार’जेव्हा बंद होत जातात..

समोवार’ हे शहरातल्या एका रेस्टॉरन्टचं नाव असतं पण अनेकांकरता ते केवळ खाण्या-पिण्याचं ठिकाण नसतंत्यांच्याकरता ते वैयक्तिक भावना गुंतलेलं एक ठिकाण असतं ज्यात आनंदाचेदु:खाचेजिव्हाळ्याचेनैराश्याचेउमेदीचेयशाचेअपयशांचेही असंख्य क्षण भरुन असतातमुंबईसारख्या गजबजाटीकोलाहल भरुन राहिलेल्या शहरांमधे अशीही काही निवांत बेटं असतात ज्यांचं नाव समोवार’ असतं.
--
सकाळचे अकरा वाजले की एक परदेशी तरुण मुलगी आपल्या लहान मुलीला प्रॅममधे घालून रोज त्या रेस्टॉरन्टमधे यायचीपॉट टी मागवायची आणि तिथल्या टेबलावर बसून पुस्तक वाचायची किंवा पत्र लिहायचीलिहिताना काहीवेळा तिच्या डोळ्यातून अश्रू यायचेचेहराही अनेकदा दमलेला दिसायचारेस्टॉरन्टच्या मालकिणीच्या ते लक्षात आलं तेव्हा तिने ऑर्डर दिलेली नसतानाच त्या टेबलावर ऑमलेट आणि ज्यूसही पाठवायला सुरुवात केलीपत्र लिहिणारी सावकाश ते संपवायचीमग बिल देऊन मुलीला घेऊन निघून जायची. जाताना रेस्टॉरन्टच्या मालकिणीचे आभार मानायला विसरायची नाहीमग हळू हळू गप्पा सुरु झाल्यातेव्हा कळलं की ती तरुण मुलगी आपल्या इंग्लंडमधल्या नातेवाईकांना खूप मिस करतेयभारतात रहाण्याचीइथल्या आयुष्याशी जुळवून घेण्याची सवय करण्याची धडपड करताना थकून जातेयआपल्या लहान मुलांचं आवरुनघरातलं काम करुननव-याचं खाणंपिणं करुन तो कामावर गेला की ती इथे येते आणि इथेच फ़क्त तिला निवांत वेळ मिळतो घरच्यांना पत्र लिहून खुशाली कळवण्याचातिकडच्या मित्र-मैत्रिणींना इथल्या गमती जमती कळवायलाकाही दिवसांनंतर एका संध्याकाळी ती आपल्या नव-यासोबत तिथे आलीतेव्हा रेस्टॉरन्टच्या मालकिणीला कळलं की तरुणी शशी कपूरची बायकोजेनिफ़र केन्डल कपूर आहेप्रॅममधली ती चिमुरडी होती संजाना कपूरते रेस्टॉरन्ट होतं नुकतंच बंद झालेलं सामोवार.

सामोवार बंद होणार हे कळल्यावर संजाना कपूरने ही आठवण सांगीतलीती जेव्हा सांगते की ती अक्षरशया जागेत वाढली आहेलहानपणापासूनचे अनेक आनंदाचे क्षण या जागेत साठून आहेत तेव्हा त्यात अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही.

एकटाएकाकी आराकॅनव्हासचं ओझं घेऊन हिंडणारासमोवारमधे बिनदुधाचा चहा पित गप्पा मारणाराकधी समोवारमधे न खाणारात्याला वांग्याचं भरीत खावसं वाटलं तेव्हा त्याने समोवारमधूनच तेरा रुपये घेतले वांगीटोमॅटोमिरच्या आणायला आणि मग तिथल्या किचनमधे ते बनवलं.

मुंबईतून फ़्रान्सला गेलेले आणि तिथून पुन्हा पुन्हा मुंबईत येत राहिलेलेपरत जात राहिलेले रझा जहांगिरमधे झालेल्या त्यांच्या एका चित्रप्रदर्शनानंतर खूप उशिरासगळी गर्दी ओसरल्यावर सामोवारमधे चहा प्यायला आले आणि जाताना टेबलावरच्या पेपर नॅपकिनमधे लिहून गेले- “किप मी बॅकडोन्ट लेट मी लिव्हक्लास्प मी टू दिज शोरसमुझे आप यहां रोक लिजिए-”.

लक्ष्मण श्रेष्ठ नेपाळवरुन जे जे स्कूल ऑफ़ आर्टमधे शिकायला आले चित्रकलेच्या ओढीनेघरच्यांचा विरोध होता त्यामुळे जवळ पैसे नसायचेचहोस्टेलवर जेमतेम रात्री झोपण्यापुरता आसराअशात जे जे मधून पास आऊट होत असतानाच त्यांचं प्रेम जडलं एका सुंदरश्रीमंत घरातल्या मुलीवरजहांगिर आर्ट गॅलरीच्या पाय-यांवर ते तिच्याशी खूप वेळ गप्पा मारत बसायचेसामोवारच्या उषा खन्नांनी बरेच दिवस ते पाहिलं आणि त्याला आत रेस्टॉरन्टमधे येऊन बसत जा असं सुचवलंतो मुलगा संकोचलात्याच्याजवळ तिथे रोज चहा प्यायला पैसे नव्हते. पण सामोवारमधे चालत होतं जमेल तेव्हा पैसे दिलेलेतो मुलगा हळू हळू तिथे इतका रमला की एकदा त्याने विचारलं की मूली का आचार’ का बनवत नाही तुम्ही इथेहा खास नेपाळी पदार्थ त्याला त्याच्या मैत्रिणीला खिलवायचा होतातेव्हा त्याच्याकडूनच रेसिपी घेऊन ते बनवलं गेलंमग तो पदार्थ मेनू कार्डावर आलालक्ष्मण श्रेष्ठांचं पुढे त्या मुलीशी म्हणजे सुनिता परळकरांशी लग्न झाल्यावर सामोवारच्या स्टाफ़ने त्यांना पार्टी दिलीलक्ष्मण आणि त्यांची बायको सामोवारमधे नियमित येत राहिलेअगदी परवा सामोवार बंद होईपर्यंत. लक्ष्मण आवर्जून सांगतात की गरज होती तेव्हा पेंटींगची मोठी कामं त्यांना मिळाली हुसेनसारख्या इथेच मिळालेल्या मित्रांनी करुन दिलेल्या इथल्या ओळखींमधून.

लक्ष्मण श्रेष्ठआराजेनिफ़र कपूरसारखे अनेक जन असतात या अवाढव्यगजबजलेल्या शहरात पण समोवारसारख्या जागा मात्र अगदीच मोजक्याशेवटच्या काही उरलेल्या.

मुंबईसारख्या शहरात असं एखादं रेस्टॉरन्ट अशा या अनेकांकरता काय असतं नेमकं?

जे जे स्कूल ऑफ़ आर्टमधे शिकणारेतिथून डिप्लोमा घेऊन बाहेर पडलेले आर्टिस्टथिएटरसिनेमामधे काही नवं करु पहाणारेलिहू पहाणारेकविता करणारेस्वप्न पहाणारे हजारो तरुण आणि तरुणी.
काय हवं असतं त्यांना शहरात?

जवळ पैसे नसतात तेव्हा त्यांना उधारीवर खाण्याची मुभाकाम मिळवायला फोन करायला लागतो म्हणून कॅश काउन्टरजवळच पब्लिक बूथची सोयचित्रकारांना त्यांची चित्र विकत घेऊ शकतील अशांशी ओळखीलेखकांना लिहायला एक निवांत टेबलकार्टुनिस्टकरता समोर अनेक इंतरेस्तींग चेहरेएकंदरीत अनेकांना दिवससभर हवी तितकीहवा तितका वेळ बसता येईल अशी जागाज्यांच्याकडे परमनन्ट अड्रेस नाही अशांना पत्रव्यवहार करण्याकरता एक पत्ताकवीपत्रकारउभरते लेखकजाहिरात व्यावसायिकसिनेमा नाटकांमधे काम करणारे सगळेच एका ठिकाणी जमा होणारमग त्यातून अनेक पुढील काळात दंतकथांचं स्थान मिळालेल्या गोष्टी घडणारपत्रकारांना शहरातल्या सांस्कृतिक घडामोडी टिपायला वाव.. ताज्या बातम्या कळण्याचंबातम्या घडण्याचं एक ठिकाण.

दमून भागून समोवारमधे येऊन टेकणं हे घरात येऊन टेकण्यासारखंचरेस्टॉरन्ट अनेकांच्या लग्नाला साक्षीदार राहिलंत्यांच्या डिव्होर्सलाही ते साक्षी होतंचजतीन दासांनी आपलं लग्न सामोवारमधेच पंडिताला बोलावून इथल्या स्टाफ़च्या साक्षीने लावलं आणि मग त्याची आठवण म्हणून रेस्टॉरन्टच्या छतावर न्यूड काढलंलग्न टिकलं नाही पण त्याने काढलेलं छतावरचं पेंटींग टिकलं अनेक वर्षंमग एका पावसाळ्यात गळणा-या छतावरचं न्यूडही पुसलं गेलंजतीन दासांनी नवं लग्न केलंते आणि त्यांची नवी बायको येत राहिलेनाती जमलीतुटलीपुन्हा जुळली इथे.

गीव्ह पटेलअकबर पदमसीजहांगिर सबावालाअर्पना कौरअंजोली इला मेननजोगेन चौधरीअल्ताफ़, प्रोतिमा बेदीरत्ना पाठकनासिरुद्दीन शहाशाम बेनेगलअमोल पालेकर..  न्यू वेव्ह सिनेमाच्या जन्मालाबहरालाआधुनिकसमकालिन कला मुंबईत रुजत जाताना समोवार साक्षी होतं.
ज्ञानेश्वर नाडकर्णीबेहराम कॉन्ट्रॅक्टररणजित होस्कोटेनिस्सिम इझिकेलअनिल धारकरडॉम मोरेसफ़्रॅन्क सिमोससारखे अनेक जण मुंबईच्या बदलांच्याघडामोडींच्या नोंदी वृत्तपत्रकवितालेखांमधून वेध घेणारे इथे रमलेप्रसिद्ध झालेअस्ताला गेले.
फ़ॅशन्स बदलल्याबेल बॉटम आलानाहिसा झालापुन्हा आलाबलराज सहानी पासुन आय एस जोहर पर्यंतशोभा राजाध्यक्ष पासुन डॉली ठाकोरपर्ल पदमसीकबीर बेदीशाम बेनेगललक्ष्मण श्रेष्ठपरिक्षित सहानीआरासत्यदेव दुबे अशांना यशाच्या उंबरठ्या अलिकडे झगडताना आणि मग तो ओलांडून जाताना पाहिलं.

जेव्हा खिसे रिकामे असलेले भणंग सृजनाच्या उर्मी मनात घेऊन शहरातल्या रस्त्यांवरगल्ल्यांमधून भटकत असतात तेव्हा त्यांना अशा जागांची गरज असतेशहरातली कला-साहित्याची संस्कृती मग इथेच रुजतेफ़ोफ़ावत रहाते.  
समोवारसारख्या जागा गजबजलेल्या शहरातले सांस्कृतिक ओऎसिस असतातअशा जागा फ़क्त भेटण्याच्याखाण्यापिण्याच्या जागा नसतातइथले खाद्यपदार्थ उकृष्ट असतीलच असं नाही पण ते त्यांच्या चवीलाखिशाला परवडणारेरुचणारे बनत गेलेले असतात.
इथे येणारी माणसं घडतातमोठी होतात आणि मग जागाही मोठी होतेप्रसिद्ध होतेग्लॅमरसही होतेपण ती उर्मट होत नाहीस्नॉबिशही नाहीती येणा-याला जिव्हाळा देत रहाते
  
हळू हळू शहर बदलत गेलंबॉम्बेचं मुंबई झालंरस्ते बदललेनकाशे बदलायला लागलेइराणी कॅफ़े एकामागोमाग एक नाहिसे होत गेलेकॉफ़ी हाऊसेस बंद पडत गेलीस्ट्रॅन्ड सारखी घरगुती जिव्हाळ्यातून चालवलेली पुस्तकांची दुकाने बंद पडलीमिनर्व्हामेट्रोरॉक्सी बंद पडलंनाट्यगृह बंद पडलीएकेका फ़्लायओव्हरखाली अशी अनेक ठिकाणं जमिनदोस्त होत गेलीशहराच्या नकाशावरची निवांत बेटं होती जी हळू हळू खचत गेलीशहरातल्या वाढत्या चकचकाटातझगमगाटात बुडून गेली.
तरी सामोवार होतंते होतं तोवर या बदलांची झळ लागली नाहीपण आता तेही नाही आणि मग तेव्हा प्रश्न पडतो की आता यानंतर कायअजून एखादी अशी जागा आहे का शहरात याचा विफ़ल शोध घ्यायचा की तशी निर्माण होईल अशी आशा करत रहायचं की आता काळ इतका बदललाच आहे तर अशा जागांची गरजही नसणार आपल्याला आणि कुणालाच असं समजत रहायचं?

शहरातली समोवार जेव्हा बंद पडतात शहरातल्या संस्कृतीचा एक प्रवाह बंद होतोआणि मग अनेकांच्या नॉस्टेल्जियाचं एक गाठोडं बांधलं जात आणि ते शहराच्या इतिहासात फ़ेकलं जातंअनेक जण हळहळतातत्यात सामान्य असतातनोकरी असलेले असतात,  नसलेले असतातशिकणारे असतातस्ट्रगलर्स असतातसेलेब्रिटी असतातस्थिरावलेलेनाव कमावलेले, स्थलांतरीतपर्यटक, अगदी हायकोर्टातले वकिलदलाल स्ट्रीटवरचे बनिये असे अनेक जण त्या हळहळणा-यांमधे असतातत्या जागेत त्यांच्या भावना गुंतलेल्या असतातआठवणी अडकलेल्या असतात तिथल्या टेबलखुर्च्यांमधेते जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा त्यांना एक कप चहावर तासनतास बसून रहायलासिगरेटच्या धुरात विचारांची वर्तुळं काढायलाचर्चा करायलायोजना आखायलात्या कागदावर मांडायलाइतरांची मतं आजमावून बघायलाआपल्यासारख्या इतर काहींचं नेमकं काय चाललय काय चाललेलं नाही ते चाचपडायला इथे जागा मिळालेली असतेखिशात पन्नास रुपये असणा-याला आणि पाच हजार असणा-यालाही सामावून घेण्याची क्षमता अजून कुठे असणार?
इंच इंच जागेचा हिशेब लावणा-या महागड्या शहरात अशा बेहिशेबी जागांचं मोल करता येत नाही.

सुख वाटायलादु:ख शेअर करायलानिराशा गिळून टाकायला अशा जागांची गरज असतेशहराच्या कॉस्मोपोलिटन संस्कृतीमधे संवाद निर्माण व्हायलाएकजिनसीपणा वाढवायलाही या जागा गरजेच्या असतात.
समोवार बंद पडतात तेव्हा भेटण्याच्या जागा हरवतातगप्पांची ठिकाणं हरवतात. पिढ्यानपिढ्या कुटुंबांनीमित्रमैत्रिणींनी एकत्रित घालवलेले अनेक क्षण ज्या जागांमधे भरलेले असतात त्या जागा शहरातल्या रस्त्यांवरुन अचानक नाहिशा होतात.
शहरातली लोकं मग आठवणी काढत रहातातकधी वे साईड इनच्याकधी भुलाभाई मेमोरियल सेंटरच्याआर्टिस्ट सेंटरच्याकोप-यावरच्या इराण्याच्या.
अशा जागेला त्याचं असं खास व्यक्तिमत्व असतंजे इथे येणा-यांच्या व्यक्तिमत्वातून उत्क्रांत होत जातंघडत जातंतेही मग हरवतं.  
आणि मग शहर एकसुरी बनत जातंजास्त यांत्रिकमल्टीनॅशनल बॅन्क्सब्रॅन्डेड शॉप्सचेन रेस्टॉरन्ट्सच्या साचेबद्ध सजावटीखाली शहर आपला चेहरा हरवत जातंगुळगुळीत होत जातं शहराचं व्यक्तिमत्वइतर चार आंतरराष्ट्रीय शहरांसारखंच ते एक.
शहराचं सांस्कृतिक अस्तर थोडं थोडं विरत जातंशहर थोडं थोडं झिजत जातंथोडं थोडं पोकळ होत जातं.
शहरातला उबदारपणालोभसपणा थोडा थोडा हरवत जातो.
--
शहराला हवी असते एक जागाजिथे गप्पा होतील निवांतप्रेमात पडलेल्यांना नुसतंच बसता येईल एकमेकांच्या सहवासात संध्याकाळच्या सावल्या लांबेपर्यंतस्ट्रगलर्सना आपली उमेद टिकवायलानिराशा लपवायला जागा मिळेलभविष्याची स्वप्न रंगवायलारंगवलेली कागदावर उतरवायलाकलाकारांनालेखक-कवींना निवांतपणा मिळेलएखाद्या वयस्करस्पर्धेत मागे पडलेल्या कलाकाराला आसपासच्या ताज्याउमेदीच्या तरुण कलाकारांच्या सहवासात नवी उर्जा मिळेल. जागा नुसती निवांत असून चालत नाहीतशी तर अनेक एकट रहाणा-यांच्या फ़्लॅटमधेही ती असतेचपण गरज असते वातावरणातून उर्जा मिळण्याचीइन्स्पायर होण्याचीसातत्याने येणा-या सर्जनशील व्यक्तींमुळे निर्माण झालेल्या सिनर्जीचीबिझिबीने आपले कॉलम मागून कॉलम समोवारच्या टेबलांवर बसून लिहिले ते अशा वातावरणामुळेचनाहीतर निवांतपणाची त्याला काय कमी असणार?

मॉलच्या पाय-यांवरफ़ूडकोर्टातस्टारबक्ससीसीडीमधेटी लाउन्जेसमधे हे सगळं कसं शोधायचं


इतक्या जलद आणि मोठ्या प्रमाणावर नकाशे बदलत जात आहेत की लोकं विसरुनच जातील शहरात अशी बेटंही होती जिथे साधेपणाआपलेपणाउबदारपणासोबत सांस्कृतिक जिव्हाळा फ़ुकट मिळत होता
--
लेख लोकमतच्या 'मंथन' पुरवणीमधून पुनर्मुद्रित.

No comments:

Post a Comment